“येत्या सहा महिन्यात मोदींचं सरकार पडणार”; खळबळजनक दावा समोर

Modi government | देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. मोदी सत्तेत येऊन आता सहा महीने होत आले आहेत. सध्या देशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. झारखंडसोबतच महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका पार पडते आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या एका बड्या नेत्याने अत्यंत मोठी भविष्यवाणी केली आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. (Modi government )

येत्या सहा महिन्यात केंद्रातील मोदींचे सरकार पडणार, असा दावा महाविकास आघाडीमधील नेत्याने केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा केलाय. “पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना महाराष्ट्र भीक घालत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपचा पराभव होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येताच पुढच्या सहा महिन्यात केंद्रातील मोदी सरकारही पडणार”, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.

“मविआ सत्तेत येताच केंद्रातील मोदी सरकार पडणार”

संजय राऊत यांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. “भाजपा हा जाहिरातीवर तारलेला पक्ष असून 2014 मध्ये जाहिरातबाजीवर खर्च करुन मोदी सत्तेत आले. या दहा वर्षांत त्यांनी काय फार मोठी क्रांती केली नाही. त्यांनी आधुनिक हिंदुस्थान घडवलाय, असं काही वाटत नाही”, असंही राऊत म्हणाले. (Modi government )

“मोदींनी नवीन काहीही केलं नाही. शिवतीर्थावर ते सभा घेतायेत. पंतप्रधान मोदींनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीला स्मरुन सांगावं की महाराष्ट्र तोडण्यासाठी, मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली की नाही? हे त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवून सांगावं.”, असं आव्हान देखील राऊत यांनी मोदींना दिलं आहे.

“राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार”

पुढे राऊत म्हणाले की, “कोणतीही निवडणूक असली की भाजपवाले त्यांना प्रचारात उतरवतात. नाहीतर ते जागतिक दौऱ्यावर असतात. जगात फिरत असतात. हा आधुनिक हिंदुस्थानाचा शिल्पकार या देशात असतो का?”, असा टोला देखील राऊत यांनी मोदींना लगावला. आज ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडी निवडून येईल, असा विश्वास देखील व्यक्त केलाय.(Modi government )

News Title –  Modi government will be collapsed says sanjay raut

महत्त्वाच्या बातम्या-

बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न अखेर मिटला, चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश

“आम्ही धर्मयुद्ध लढत बसू अन् तिकडे अमृता फडणवीस रील बनवत..”; ‘या’ नेत्याचा टोला

ऐन निवडणुकीत दुःखद बातमी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं निधन

“तुम्ही ज्यावर प्रेम केलं, तो सूरज आता तसा नाही…”; कोकण हार्टेड गर्लने वादावर मौन सोडलं

मोठी बातमी! नितीन राऊत यांच्या कारचा भीषण अपघात, प्रचारावरून परततानाच..