बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वर्ल्ड रेकॉर्डसाठीच मोदी सरकारची साठेबाजी?- पी. चिदंबरम

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असून तिसरी लाट थोपवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटासाठी देखील मोफत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र, दुसरीकडे लसीकरणाचे आकडे रोज मोठ्या प्रमाणावर बदलत असल्यामुळे लसीकरणाच्या कामगिरीमध्ये सातत्य असल्याचं दिसून येत नाही. अशातच आता यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे.

रविवारी लसींची साठेबाजी त्यानंतर सोमवारी लसीकरण त्यानंतर मंगळवारी पुन्हा ये रे माझ्या मागल्या हेच एक दिवसाच्या लसीकरणाच्या वर्ल्ड रेकॉर्डमागील रहस्य आहे का?, असा प्रश्न करत पी. चिदंबरम यांनी सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर मोदी सरकारच्या या कल्पनेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येच स्थान मिळायला हवं असाही टोलाही लगावला.

पुढे चिदंबरम यांनी म्हटलं की, कोणाला ठाऊक मोदी सरकारला वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कारही मिळू शकेल. त्यामुळे ‘मोदी है, तो मुमकीन है’ असं म्हणण्याऐवजी आता ‘मोदी है तो चमत्कार है’, असं वाचायला हवं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना आता 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारचं घेईल, अशी घोषणा केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहुर्तावर 21 जूनपासून लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच या दिवशी सरकारनं लसीकरणाचा जागतिक विक्रम केल्याचं जाहीरही करण्यात आलं.

 

थोडक्यात बातम्या – 

“कोरोनाचे नियम पाळूच पण मूर्ती मात्र उंचच आणू”

“ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा”

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला; किवींना विजयासाठी 139 धावांचं लक्ष्य

‘आता एवढा माज आला का?’; शहनाझचा ‘हा’ व्हिडीओ पाहून भडकले चाहते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More