बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारचा खासगीकरणाचा सपाटा सुरुच, आता विकणार ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली | मोदी सरकार गेल्या काही दिवसांपासून सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणावर भर देताना दिसत आहे. त्यातच आता मोदी सरकार आणखी एक कंपनी विकण्याच्या तयारीत आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सेन्ट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे 100% भागभांडवल आणि व्यवस्थापनाचे नियत्रंण हस्तांतरित करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सेन्ट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अभियांत्रिकी कंपनी आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद मध्ये सेन्ट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे युनिट आहेत. या कंपनीमध्ये सोलार फोटोवोल्टाईक्स, फेरिट्स आणि पिझो सिरेमिक्स सारखे पार्ट तयार होतात. या कंपनीची सुरूवात 1977 साली करण्यात आली होती.

केंद्र सरकार सेन्ट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीमधील संपूर्ण हिस्सा विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या अटींनुसार कंपनी खरेदी करणाऱ्या कंपनीची मार्च 2019 पर्यंत किमान 50 कोटींची संपत्ती असणं बंधनकारक आहे. तसेच कंपनी खरेदी करणाऱ्या व्यवस्थापकास पुढील तीन वर्षे कंपनीतील समभाग विकण्यास मनाई असणार आहे.

दरम्यान, मागील वर्षांपासून केंद्र सरकार विविध शासकीय संस्था तसेच कंपन्यांमधील गुंतवणूक निर्गुंतवणूकवर भर देताना दिसत आहे. निर्गुंतवणूकीमधून केंद्र सरकारला मिळालेल्या पैश्यातून केंद्र सरकार देशातील विविध योजनांवर खर्च करणार असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, मोदी सरकारच्या या धोरणावर विरोधी पक्षाकडून मात्र टीका होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या –

“पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर असावा ही जनतेची इच्छा”

रात्री 11.30 ते सकाळी 6 व्हॉट्सअप बंद राहणार?; पीआयबीकडून मोठं स्पष्टीकरण

“मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण, मला कधी फडणवीसांसारखं वाटलं नाही”

घरगुती गॅसची किंमत चक्क दुप्पट; एका सिलिंडरची किंमत अडीच हजार रुपये?

चिंताजनक ! कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आता आढळली नवी बुरशी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More