देश

मोदी सरकारचा ‘तो’ प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; शेतकरी मागणीवर ठाम

नवी दिल्ली | आज केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना नवा प्रस्ताव देण्यात आला. पण शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा हा कायदा दुरुस्ती प्रस्ताव फेटाळला आहे.

नव्या कायद्यात किमान आधारभूत किंमत अर्थात MSP कायम राहील असं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. पण तिनही कृषी कायदे रद्द करा, असं शेकऱ्याचं म्हणणं आहे.

आज शेतकऱ्यांना एक लिखित प्रस्ताव देण्यात आला होता. त्यात काही दुरुस्त्या करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं. त्यात MSP कायम ठेवण्याच्या आश्वासनाचाही समावेश आहे. मात्र, कृषी कायदे परत घेण्यापलीकडे आम्ही काहीच मान्य करणार नाही, असं शेतकऱ्यांकडून सरकारला कळवण्यात आलं आहे.

सरकार अडून बसलं असेल तर आम्हीही हट्टी आहोत. सरकारला कायदे परत घ्यावेच लागतील, असं भारतीय किसान संघाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

थो़डक्यात बातम्या-

पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय?; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला सवाल

शेतकऱ्यांसाठी फ्री डिझेल; ‘या’ महामार्गावर सुरु आहे खास पुरवठा!

“देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”‘शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात’; दावनेंचा अजब दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या