बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देश अंधारात जाण्याची भीती!; राज्य सरकारची मोदींवर जोरदार टीका

मुंबई | देशात सध्या कोळशाचा मोठा प्रमाणावर तुटवडा असल्याचं चित्र आहे, त्यामुळे देशावर सध्या गंभीर वीज संकट येण्याची शक्यता आहे. केंद्राच्या धोरणामुळे राज्य सरकारांना मोठा ताप होण्याची चिन्हं आहेत, त्यामुळे केंद्राच्या या धोरणावर राज्यांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यांसदर्भातच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचं सरकार असताना वीज तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून मोठे प्रयत्न करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दूरदृष्टीनं देशातील वीज पुरवठ्याबाबत योग्य धोरण आखलं होतं, मात्र आताचं सरकार नीट कारभार करताना दिसत नाही. सध्या  असलेल्या कोळशाच्या तुटवड्याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

मनमोहन सिंग सरकारवर कोळसा घोटाळ्याचा चुकीचा आरोप करून मोदी सरकारने कोळसा खणीकरण बंद केल्यानं आज देशावर वीज संकट आलं आहे. मोदी सरकारने आपल्या मर्जीतील लोकांना कोळसा खणीकरणाचे अधिकार दिले, परिणामी आपल्याला या मोठ्या संकटातून जावं लागत आहे, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी सुद्धा केंद्र सरकारवर वीज संकटाबाबत जोरदार टीका केली आहे. सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारला वीज संकटासाठी जबाबदार धरत आहेत. मोदी सरकारवर नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भाजप आता काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या 

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता

बहुप्रतिक्षित IPO बाजारात धडकणार! ‘या’ कंपनीबाबत केंद्र सरकार लवकरच मोठी घोषणा करणार

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More