देश

भंडारा रुग्णालय दुर्घटनेमधील पीडित कुटुंबीयांना मोदी सरकारकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर!

नवी दिल्ली | भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या आगीत अतिदक्षता विभागात ठेवलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.

या दुर्घटनेत जी बालकं गंभीर जखमी झाली आहेत त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणाही केंद्र सरकारने केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून आज ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही रक्कम दिली जाणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीला आग लागली होती. यावेळी रुग्णालयात धूर जमा झाल्यामुळे अतिदक्षता विभागात ठेवलेल्या तब्बल 10 बालकांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली गेली.

 

थोडक्यात बातम्या-

‘हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली’; भाजप खासदाराचं वक्तव्य

“…तर संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे, दोघांची वैचारिक उंची सारखी आहे”

MPSC कडून विविध पदांच्या पूर्व परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर!

“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकून मला वेदना देऊ नका”

महाराष्ट्र हादरवणारी घटना; गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या