देश

मोदी सरकारकडून गॅसधारकांना नवीन वर्षाचं गिफ्ट; सिलेंडरच्या दरात कपात

नवी दिल्ली | घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करून गॅस धारकांना मोदी सरकारनं नवीन वर्षाच गिफ्ट दिलं आहे. अनुदानित सिलेंडरच्या दरात 5.91 रुपये तर विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 120.50 रुपयांची कपात केली आहे.

गॅस सिलेंडरच्या दरात 1 डिसेंबर रोजी अनुदानित सिलेंडरच्या दरात 6.52 रुपये तर विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 133 रुपयांची कपात केली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत LPG ची किंमत कमी झाल्यानं आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबुत झाल्यानं दर कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचं इंडियन ऑईलनं म्हटलं आहे.

दरम्यान, एका महिन्याच्या कालावधीत अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत 14.13 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“काॅंग्रेस म्हणजे थापा, खोटारड्यांच्या तोंडी अफवांच्या वाफा”

-…त्यावेळी तुम्ही त्यांचा निषेध केला होता का? अनुपम खेर यांना ज्वाला गुट्टाचा सवाल

-‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांचा खराखुरा आवाज घुमणार?

-“मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही”

-“जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या