बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दीदी, हवं तर मला लाथा मारा पण…- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोलकता | सध्या देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूका लागल्या आहेत. तर या पाच विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये संपुर्ण ताकदीनिशी उतरला आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी आपला किल्ला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी बांकुरा येथे सभा घेतली आणि ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

आजकाल दिदी माझ्यावर राग काढत आहेत. त्यांच्या लोकांनी तयार केलेल्या पोस्टरमधून माझ्या डोक्यावर दिदींचा पाय ठेवताना दाखवत आहेत, असं मोदी या सभेत म्हणाले. यावर पुढे बोलताना मोदी म्हणाले, हवं तर तुम्ही माझ्या डोक्यावर पाय ठेऊ शकता. तुम्ही मला लाथा मारू शकता, मात्र मी तुम्हाला बंगालच्या विकासाला लाथ मारू देणार नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दीदी तुमचा किल्ला आता कोसळणार आहे. आदिवासांच्या स्वप्नांना मी लाथ मारू देणार नाही. आम्ही बंगाल सरकारला कित्येक रूपये दिले आहेत. पण आमच्या बंगालच्या मुली-बहिणी आज पाण्याच्या एका एका थेंबासाठी चिंतेत आहेत. तर अनेक योजना फक्त कागदावरच का राहिल्या? बंगालमध्ये नळ कुठे आहेत?, असा सवाल देखील त्यांनी या सभेतून केला आहे.

दरम्यान, भाजपला पश्चिम बंगालमध्ये रोखण्यासाठी काँग्रेसचे मित्रपक्ष ममतांच्या बाजूने निवडणुकीच्या रिंगणात ममतांचा प्रचार करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील आहेत.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांनी उदाहरण दिलेले ‘ज्युलिओ रिबेरो’ आहेत तरी कोण?

“काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा”

“बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती”

“आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात, अन्…”

“जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?”

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More