बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये!

नवी दिल्ली | अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. तालिबाननं काबूल शहरावर ताबा मिळवल्यानंतर नागरिक पलायन करताना दिसत आहे. यातच आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं अफगाणिस्तानमधे असलेलल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्यानं आता मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

अफगाणिस्तानमधील वाढता हिंसाचार आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळे भारतातील नागरिकांना मायेदेशी परतण्याचं आवाहन भारत सरकारकडून केलं जात आहे. अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार वाढल्यामुळं अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली असून काही भागातील हिंसाचार वाढतच चालल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचं चित्र आहे.

भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी तालिबाननं दिली आहे. मात्र भारतानं आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काबूलमधील झपाट्यानं बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये भारत सरकार सतर्क आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. काबूलमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनं 2 एअर इंडिया विमानांना अलर्टवर ठेवलं आहे.

दरम्यान, केंद्राचे आदेश मिळताच ही विमानं दिल्लीहून उड्डाण करतील आणि काबुलमध्ये उतरतील. सध्या सगळ्या जगाचं लक्ष अफगाणिस्तानातील परिस्थितीवर लागून आहे.

थोडक्यात बातम्या –

चक्क खासदारच विसरले राष्ट्रगीत; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांची धडपड, विमानतळाचे फोटो पाहून हैराण व्हाल

15 ॲागस्टची सुट्टी ठरली दुर्देवी, मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव

‘…म्हणून मला देश सोडावा लागला’; अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं कारण

आज राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More