Top News देश

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली | दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सलग सातव्यांदा ऐतिहासिक भाषण करत आहेत.

सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. या स्वातंत्र्यामागे भारत मातेच्या लाखो लेकरांचा त्याग आहे. त्यांना आज नमन करण्याचा दिवस आहे. आपले सुरक्ष दलाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती जो देशाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असतो त्या सर्वांना देखील आज आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

आपण एका विशिष्ट परिस्थितीतून जात आहोत. आज मला माझ्यासमोर भारताचं भविष्य असलेले लहान मुलं बसलेले दिसत नाहीत. कोरोनाने काही आव्हानं उभी केली आहे, असंही मोदींनी सांगितलं आहे.

कोरोनाशी लढा देणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना देखील मी नमन करतो. कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांच्या कुटुंबीयांना बाधा झाली, काहींना तर आपला जीवही गमवावा लागला त्या सर्वांना मी नमन करतो. मला विश्वास आहे आपण हे कोरोना युद्ध जिंकू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या खात्यातील 15 कोटी कुठं गेले?; एक ‘मोठा’ व्यवहार माहीत झाला आहे!

अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल- रामनाथ कोविंद

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा योगायोग, की… या गोष्टीची एकच चर्चा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोनाबाधित

…तर नाईलाजाने डॉक्टरांवर मेस्मा लावाला लागेल, हसन मुश्रीफ यांचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या