बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी हे आरएसएसचे प्रचारक आहेत- नाना पटोले

गोंदिया | अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली आहेे. या घटनेचे दूरगामी परिणाम जगावर होताना दिसत आहेत. तालिबान हा आपल्या देशात राजकारणाचा विषय झाला आहे. देशातील आरएसएस हे तालिबानी वृत्तीचे आहेत, अशी टीका गीतकार जावेद अख्तर यांनी केली होती. या टीकेनंतर देशातील वातावरण चांगलचं पेटलेलं पहायला मिळत आहे.

जावेद अख्तर यांच्या टीकेवर भाजपने त्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, ही भूमिका घेतली आहे. या वादात आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलने चालू आहेत. केंद्र सरकार आपल्या हटवादी भूमिकेवर ठाम आहे. आरएसएसच्या पाठिंब्याशिवाय हे घडू शकत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ते गोंदियात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशाचे पंतप्रधान हे आरएसएसचे प्रचारक आहेत. ते संघाचं काम करतात. देश हा उद्योगपतींच्या घश्यात घातला जात असताना संघ गप्प का आहे?, असा सवालही नाना पटोले यांनी संघाला आणि केंद्र सरकारवर केला आहे.

देश हा सर्वात मोठा असतो. एखादी संघटना जर स्वत: ला देशापेक्षा मोठं समजत असेल तर ही देशासाठी हानिकारक गोष्ट आहे, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत. जावेद अख्तर यांनी संघावर टीका केली असेल तर टीका करण्यात गैर असं काहीच नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी यावेळी केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“तुमच्याकडे शूरता नाही का? शरद पवारांना अटक केली नाही तर…”

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

धक्कादायक ! मुंबईच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही जीवावर उदार होऊन शूटिंगला जातो; ‘अग्गंबाई सासूबाई’तील कलाकार भडकला!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More