बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोदींनी केली मोठी घोषणा!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 स्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्यासह संभाव्य उपाययोजनांवर चर्चा करून आढावा घेतला. यावेळी कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिलं जाईल. त्यांच्या विभागाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कोविडशी संबंधित कर्तव्य केलं पाहिजे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कोविड रुग्णांच्या सेवेत 100 दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचारी यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिलं जाईल, अशी माहिती आहे.

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असून, ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या या संकटानंतरही देशाला डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

मन हेलावून टाकणारा फोटो; कोरोना मुक्त झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी

‘पराभूत झालो तरी…’; पराभवानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया

“अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती, ते आकाशात उडत होते”

भटजीला थोबाडीत मारुन लग्न थांबवणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं

निवडणुका संपल्या! आता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More