देश

मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोदींनी रेल्वे स्टेशनवर कधीच चहा विकला नाही, असा खुलासा माहिती अधिकारातून झालाय.

मोदी खरंच चहा विकायचे का?, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते तहसीन पुनावाला यांनी माहिती अधिकारातून विचारला होता.भारतीय रेल्वे बोर्डकडे यासंदर्भात माहिती मागण्यात आली होती. मोदींनी रेल्वे स्टेशनवर चहा विकला, अशी नोंद नसल्याचा खुलासा रेल्वे बोर्डाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, मी लहानपणी उदरनिर्वाहासाठी रेल्वे स्टेशनवर चहा विकायचो, असं मोदी नेहमी आपल्या भाषणात सांगत असतात.

महत्त्वाच्या बातम्या –

-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या