बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतापुढचं सर्वांत मोठं आव्हान मोदींनी सांगितलं, म्हणाले…

नवी दिल्ली | वाढत्या लोकसंख्यामुळे कुटुंबात विभागणी होऊन गावांमध्ये शेतकऱ्यांकडील जमिनीचं प्रमाण कमी होतंय. हे मोठं आव्हान आहे. सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं आधी दिलं गेलं नाही. आता या शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जातंय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडुंचे स्वागत केलं. या खेळाडुंनी केवळ आपली मनं जिंकलेली नाहीत तर त्यांनी भविष्यातील नव्या पिढीली प्रेरणा दिली आहे. त्यासाठी आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करुयात, असं मोदी म्हणाले.

कोरोनाच्या काळात भारतीय वैज्ञानिकांनी उत्तम काम केलं. कोरोना लसीसाठी आपल्याला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागत नाही. फक्त विचार करा की, आज आपल्याकडे स्वदेशी कोरोना लस नसती तर काय झालं असतं? भारतात पोलिओची लस येण्यासाठी कित्येक वर्ष लागल्याचं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांना दिलासा! आजपासून ‘या’ नियमांमध्ये मिळणार सवलत

‘प्रत्येक घरात वीज आणि शौचालय पोहोचलं आता…’; लाल किल्ल्यावरुन मोदींकडून नवी घोषणा

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात, 54 कोटींपेक्षा जास्त लोक लसवंत- नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

आज 75 वा स्वातंत्र्यदिन; पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहन करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More