बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींना खोटं बोलण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हवा- दिग्विजय सिंह

नवी दिल्ली |  फेब्रुवारी 2012 केरळच्या किनाऱ्यावरील दोन मासेमाऱ्यांना मारल्याचा आरोप दोन इटालियन खलाशांवर होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात चालू होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद मोदींवर निशाणा साधला आहे.

खोटं बोलण्यासाठी नरेंद्र मोदींना नाबेल पुरस्कार देण्यात यावा, असं म्हणत दिग्विजय सिंह यांनी मोदींना टोला हाणला आहे. पंतप्रधान नसताना मोदींनी या प्रकरणाची कारवाई धीम्या गतीने चालली असल्याचं म्हणत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर एनडीए सरकारने मौन धारण केल्याने दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे.

खोटं बोलण्याच्या बाबतीत मोदींना फक्त नोबेलच मिळणार नाही, तर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप असेल तर त्यात मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळेल, त्यांना हरवणं अशक्य आहे, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. या निर्णयानंतरनरेंद्र मोदींचं एक जुनं ट्विट व्हायरल व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी सोनिया गांधींवर टीका केली होती.

दरम्यान, मॅडम जर एवढ्याच देशभक्त असतील तर त्यांनी या खलांशांना कोणत्या तुरुंगात डांबलं हेही सांगून टाकावं, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. त्यामुळे दिग्विजय सिंह यांच्या या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

ब्रेकींग! शिवसेना भवनासमोर आंदोलनात भाजप-सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

भाच्याची गाडी अडवल्याने महिला आमदारने लगावली पोलिसाच्या कानशिलात

‘सगळं काही मॅनेज झालं असं….’; अजित पवारांच्या त्या फोन कॉलबाबत संभाराजेंनी केला गौप्यस्फोट

“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचा शोध; तीन शिवकालिन चित्र परदेशातील संग्रहालयात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More