बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट शेतकरी संघटनांशी चर्चा करावी”

चंदीगड | नव्या कृषी कायद्यांना विरोध असणाऱ्या शेतकरी संघटनांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट चर्चा करावी. त्यांच्या समस्या ऐकून त्यावर सर्वमान्य तोडगा काढला जावा, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी केली आहे.

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) व्यवस्था संपुष्टात येईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यात प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतलं आहे.

त्याच पार्श्वभूमीवर बादल यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, लहान शेतकरी त्यांचा शेतमाल दूरवर नेऊ शकत नाही. ते अनेक महिने शेतमाल साठवूही शकत नाही. त्यामुळे शेतमालाच्या किमतीबाबत ते खासगी कंपन्यांशी घासाघीस करु शकणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावत पुन्हा अडचणीत, ‘या’ कारणामुळे कोर्टानं दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More