देश

पिकांना दीडपट हमीभाव, FRP लवकरच जाहिर करणार; मोदींचे आणखी एक आश्वासन

नवी दिल्ली | खरीप हंगामात पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. याबाबतच्या निर्णयाला येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली जाईल, असंही मोदींनी सांगितलं.

2018-19च्या ऊसाचा एफआरपीही दोन आठवड्यात घोषित केला जाईल, जो मागील वर्षीच्या तुलनेने अधिक असेल. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट होण्यास मदत होईल, असं मोदींनी म्हटलं.

दरम्यान, शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, अद्ययावत तंत्रज्ञान आणि सौरपंप यांचा वापर करावा, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का; देवेगौडांचं मोठं वक्तव्य

-… अन धावत्या बसमध्येच भरला महसूल राज्यमंत्र्याचा जनता दरबार

-पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 22 पेक्षा अधिक जागा जिंकू; अमित शहांचा दावा

-डीएसके प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची प्रकृती खालावली!

-भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या