बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी-ठाकरे भेट! पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ‘या’ 12 मुद्यांवर चर्चा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली.  उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

मराठा आरक्षणावर विस्तृत आणि सखोल चर्चा झाली. त्याच बरोबर इतर समाजासाठी आरक्षणाचा राजकीय आरक्षण, तर पदोन्नतीतील आरक्षण, जीएसटी वेळेवर देता येणं यावर देखील चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तर शेतकऱ्यांसाठी पीक विमा विषयावर चर्चा झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मेट्रो कारशेडसाठी जागेची उपलब्धता या विषयांवरही चर्चा केली अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात किनारपट्टी भागावर चक्रीवादळाचा धोका आहे. चक्रिवादळात दिल्या जाणाऱ्या मदतीचे निकष अपुरे आहेत. NDRF चे निकष बदलणे आवश्यक असल्याची देखील यात चर्चा झाली. चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी देण्याचाही विषय मांडण्यात आला. तर मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर चर्चा झाली आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या भेटीदरम्यान 12 मुद्दे मांडण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधानांसोबत झालेली बैठक समाधानकारक झाली. पंतप्रधान मोदींसोबत सुमारे 1 तास 45 मिनिटे चर्चा केली आहे. त्यांनी सर्व माहिती घेऊन निश्चित पुढील निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. त्यावर आम्ही समाधानी आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

बाबो! 37व्या वेळी विवाहबंधनात 28 बायका, 135 मुलं, 126 नातवंडांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा; पाहा व्हिडीओ

कोरोना चाचण्यांच्या अहवालाची माहिती न देणाऱ्या लॅबचे परवाने होणार रद्द?; कारणे दाखवा नोटीशीनंतरही उत्तर नाही

नाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

मित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More