देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा जैसलमेर सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करणार!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी यंदा ते राजस्थानमधील जैसलमेरच्या सीमेवर पोहोचले आहेत.

पंतप्रधान मोदींनी लोंगेवाला भागात बीएसएफच्या जवानांची भेट घेतली त्यांची विचारपूस केली तसेच दिवाळीनिमित्त त्यांना मिठाईचे वाटप करणार आहेत.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. सैन्याच्या गणवेशात ते जवानांमध्ये जाऊन त्यांना मिठाईचे वाटप केलं होतं.

या दिवाळीला एक दिवा सॅल्युट टू सौल्जरसाठी लावा. जवानांच्या अद्वितीय साहसासाठी आपल्या हृदयात जी आभाराची भावना आहे ती शब्दांत व्यक्त केली जाऊ शकत नाही. आम्ही सीमेवर तैनात जवानांच्या कुटुंबियांचे देखील आभारी आहोत, असं मोदी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

भाजपकडून महाराष्ट्रातील या तीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी!

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अभिनेता अर्जुन रामपालची 7 तास चौकशी!

“ठाकरे कुटुंबियांवरील आरोपाला नाईक उत्तर देतात, फारच जवळचे संबंध दिसतायत”

‘दिवाळीत कोरोना नियमांचं काटेकोर पालन करा’; अजित पवारांचं नागरिकांना आवाहन

ठाकरे सरकारने केलेल्या घोटाळ्या विरोधात, किरीट सोमय्या उच्च न्यायालयात मागणार दाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या