बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींच्या झंझावताला ‘या’ तीन नेत्या ब्रेक लावणार?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, बसपा प्रमुख मायावती आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी रोखू शकतात, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणुकीत आपल्या आक्रमक प्रचाराच्या जोरावर भाजपला 282 जागा मिळवून दिल्या होत्या तर एनडीएनं 336 जागापर्यंत मजल मारली होती.

प्रियांका गांधी, मायावती आणि ममता बॅनर्जी या देखील आक्रमक प्रचारासाठी प्रसिद्ध आहेत. मायावतींनी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्याशी आघाडी केल्यानं भाजप समोर आव्हान निर्माण झालं आहे. भाजपनं उत्तर प्रदेशात 2014 च्या निवडणुकीत 80 पैकी 72 जागांवर मिळवला होता.

दरम्यान, प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानं काँग्रेसमध्ये चैतन्य पसरलं आहे तर ममता बॅनर्जी यांनी कोलकत्ता येथे 22 विरोधी पक्षांची सभा घेऊन नरेंद्र मोदींच्या विरोधात रणशिंग फुंकलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाळासाहेबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

-नितीन गडकरींनी केलं पंतप्रधान पदाबाबत केलं मोठं वक्तव्य

अण्णा हजारेंच्या पत्रांना नरेंद्र मोदींचं एका ओळीचं उत्तर

-“आता भक्त म्हणतील हा आत्तापर्यंतचा सर्वात महान अर्थसंकल्प”

मिताली राजनं रचला इतिहास; वनडे सामन्यांचं द्विशतक केलं पूर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More