नवी दिल्ली | प्रधानमंत्री जन-धन योजेनेला 15 ऑगस्टला चार वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोंदी जन-धन खाते धारकांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
जन-धन खातं सहा महिने योग्य प्रकारे चालू असल्यास खातेदाराला बँकेकडून 5 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते. ही मर्यादा वाढवून थेट दुप्पट करण्यात येऊ शकते. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदी मायक्रो इन्शूरन्स स्कीमची घोषणा होण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, अटल पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनाची मर्यादा 5 हजार रुपयांवरून दहा हजार रुपये होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल!
सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी- अशोक चव्हाण
-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी
-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी
-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण