…तर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत; ‘या’ नेत्याने केला सर्वात मोठा दावा

Narendra Modi l लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. कारण भाजपला या लोकसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे भाजप आता इतर मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा :

भाजप मित्रपक्षाला हाताशी घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सत्ता स्थापन दावा करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देखील दिला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा येत्या 8 जून रोजी शपथविधी घेणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल हा पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि वेगळी ठरली आहे. मात्र आता देशात सत्ता कोणाची स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण दिल्लीत अनेक राजकीय उलाढाली होत आहेत.

Narendra Modi l नरेंद्र मोदी वयाच्या 75 वर्षानंतर पंतप्रधान राहणार नाहीत :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल थत्ते यांनी देखील निवडणुकीच्या या खेळीवर आपलं रोखठोक मत मंडळ आहे. ते म्हणाले की, ‘रामलल्लाचे बोट धरून जाणारे अवतारी पुरुष मोदी नाहीयेत. रामाने अनेकांचे बोट धरून त्यांना पुढे घेऊन गेले आहेत. मात्र तुम्ही रामाचे बोट कसे धरून जाताय हे तुमच्या अंगलट आलं आहे. त्यामुळे त्यांचा हा पराभव झाला आहे. रामापेक्षा तुम्ही स्वतःला जास्त प्रेझेंट करायला गेले. राम दाखवले मात्र तुम्ही स्वतःचे दर्शन घडवलं हे लोकांना आजिबात ही आवडले नाही.’

तसेच अनिल थत्ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना चिंतन नाही तर चिंता करण्याची गरज आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणे मदत केलेली नाही. त्यामुळे भाजपने कधीही आत्मपरीक्षण केलेलं नाही. तसेच नरेंद्र मोदी वयाच्या 75 वर्षानंतर पंतप्रधान राहणार नाही. मोदी सीट आणतील आता तो विश्वास देखील जनतेला राहिलेला नाही.

News Title : Modi Will Not Be A Prime Minister After Age Of 75 Years Said Anil Thatte

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीच्या ट्विटने उडवली भाजपवाल्यांची झोप; पाहा काय आहे ट्विट

या राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ संभवतो

अभिनेता शशांक केतकर यांची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; ‘इतके’ आमदार शरद पवारांकडे परतणार?

“माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी..”; निलेश लंकेंच्या आईच्या आरोपांनी खळबळ