नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाई सहकार संघटनेच्या संमेलनाला पाकिस्तान हवाई मार्गे जाणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं आहे.
विमान प्रावसासाठी आधी कर्गिस्तान आणि पाकिस्तान या दोन हवाई मार्गांचा विचार सुरु होता. पण आता मात्र पाकिस्तामधून न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींचं विमान आता पाकिस्तानमधून न जाता ओमान, इराण यामार्गे कर्गिस्तानची राजधानी बिश्कलेला जाणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालायाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे.
दरम्यान, शांघाई सहकार संघटनेचं संमेलन 13 आणि 14 जून रोजी पार पडणार आहे. या संमेलनाला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कलाकारांचं तौडभरुन कौतुक केलं!
-“लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का?”
-“नागपूरचं वासेपूर करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे”
-राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; पुण्यात या विद्यापीठाला स्वायत्त मान्यता
-मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे- राधाकृष्ण विखे पाटील
Comments are closed.