बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदीजींच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागलेत”

मुंबई | सध्या इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा फटका बसला आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत तर, घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीला आता राजकीय रंग चढू लागला आहे.

सध्या अमरावतीच्या भाजप खासदार नवणीत राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये त्या चक्क चूलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र शेअर केला जातोय. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नवणीत राणा यांचा व्हिडीओ रिट्विट करत कमेंट केली आहे.

गॅस महाग झाल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे, अशी खोचक टीका रूपाली चाकणकर यांनी केली आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत, असंही चाकणकर म्हणाल्या. तर वा मोदीजी वा, असा त्यांचा नेहमीचा डायलाॅग देखील त्यांनी उपरोधिकपणे मारला आहे.

दरम्यान, घरगुती गॅसच्या किंमतीत यावर्षी 2021 मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दिल्लीत आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 809 रुपयांवरुन 834.50 रुपये झाला आहे. जानेवारी सोडून इतर जवळपास सर्व महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. 4 फेब्रुवारी रोजी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ केली होती.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडेंची बैठक, बंद दाराआड झाली चर्चा

ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात येतील- अजित पवार

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘सिंधूला थार भेट द्यावी’, युजरच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तिच्या गॅरेजमध्ये…’

…त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More