बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोदीजी कृपया राजीनामा द्या…’; कंगणाचं ते ट्विट चर्चेत

मुंबई |  बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. त्यामुळे ती अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील होत असते. गेल्या काही दिवसात कंगनाने देशातील घडामोडींवर तिचं मत सोशल मीडियावर मांडलं आहे. यामुळे तिला पुन्हा ट्रोल देखील व्हावं लागलं आहे.

मोदींना नेतृत्व कसं करावं हे कळत नाही, कंगनाला अभिनय करता येत नाही, सचिनला बॅटिंग कशी करावी ठाऊक नाही आणि लता दीदींना गाता येत नाही, मात्र या ट्रोलर्सना सगळं माहित आहे, असा टोला कंगणाने ट्रोल करणाऱ्यांना लगावला आहे. तर आणखी एका ट्विट मध्ये तिनं, मोदीजी कृपया राजीनामा द्या आणि विष्णू अवतारातील एखाद्या ट्रोलरला पुढचा पंतप्रधान बनवा, असं देखील म्हटलं आहे. तिच्या या ट्विटवरून अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

‘व्वा शंभर टक्के खरं आहे, सचिन आणि लताजींबद्द्ल वगळता. त्यांचा समावेश यात करू नको. सचिनला क्रिकेट खेळता येतं आणि लताजींना गाता येतं. पण तू आणि मोदीची उत्तम अभिनय जाणता, आपले पंतप्रधान एक लीडर नसून उत्तम अभिनेते आहेत’, असा टोला एका नेटकऱ्यानं कंगणाला लगावला. तर तू फक्त चमचेगिरी कर, देशासाठी काही मदत करू नको, किती पैसे दान केलेस तू, ट्विटरवर संताप दाखवून काही अर्थ नाही, असंही एकाने कंगनाला सुनावलं आहे.

दरम्यान, ट्रोल होण्याची कंगनाची ही पहिली वेळ नाही. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात कंगना अनेकदा ट्रोल झाली आहे. त्यामुळे कंगणा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

…म्हणून त्यावेळी थांबवला होता दिल्ली आणि बंगळूरूचा आयपीएल सामना

कोल्हापूरात विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यावर वाहन जप्त होणार; कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई

धोका वाढला! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, जाणुन घ्या मागच्या 24 तासातील आकडेवारी

‘खूपच घाई असेल तर प्रश्न पाठवा उत्तरं देते’; रश्मी शुक्ला यांचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर

सावधान! महाराष्ट्रातील कोरोनाचा धोका पुन्हा वाढला; जाणुन घ्या धक्कादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More