‘मोदीजी आम्हाला वाचवा, नाहीतर आम्ही मारले जाऊ’; विद्यार्थ्यांची आर्त हाक
नवी दिल्ली | रशिया युक्रेन युद्धानं अवघ्या जगाची चिंता वाढवली आहे. आज सलग पाचव्या दिवशीही युद्ध सुरु आहे. या युद्धाचे पडसाद सगळीकडे उमटत असून याचा गंभीर परिणामही पहायला मिळत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज नऊवा दिवस आहे. युद्ध दिवसेंदिवस चिघळत चालल्याचं पहायला मिळत आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मायेदेशी परत आणण्याचं काम सुरु आहे.
अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यास यश मिळालं आहे. अद्यापही काही लोक तिथे अडकलेले आहेत. एका भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यानं वाचवण्यासाठी मोदींना साद घातल्याचं पहायला मिळतंय.
आम्हाला वाचवा, नाहीतर आम्ही मारले जाऊ, असं युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. आमच्या चारही बाजूने धोका आहे. कुठून गोळीबार होईल, हल्ला किंवा एअर स्ट्राईक होईल याचा काहीच भरोसा नाही. प्रत्येक अर्धा तास आणि तासाभराच्या फरकाने इथे एअर स्ट्राईक होतोय. इथे प्रचंड थंडी आहे. उणे तापमान आहे. इतक्या थंड वातावरणात आम्ही इथून बाहेर कसं पडणार?, असंही विद्यार्थ्यांनी म्हटलं.
यूक्रेन में हालत बुरे हैं और यहां उन्हें रोड शो से फुर्सत ही नहीं। #UkraineRussianWar pic.twitter.com/cTGyFohcZp
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) March 4, 2022
थोडक्यात बातम्या –
“रात्री माझे व्हिडीओ बघतात आणि सकाळी…”; पुनम पांडे भडकली
एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परब यांचं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…
‘माझा प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता’; 100 व्या टेस्टवेळी विराट भावूक
मोठी बातमी! ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका
राज ठाकरेंच्या दमदार आवाजातील ‘हर हर महादेव’चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडीओ
Comments are closed.