बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

’13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर…’; मोदींचं जनतेला आवाहन

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. पुढील महिन्यात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन नरेंद्र मोदी (pm modi) यांनी देशातील जनतेला केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपन ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहोत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत देशभरात येत्या 9 ऑगस्टपासून आठवडाभर ‘हर घर तिरंगा'(Har Ghar Tiranga) ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या घरावर तीन दिवस राष्ट्रध्वज फडकावा आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळकटी द्यावी असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

1947 साली आजच्या दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी आपण तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही”

शिंदे सरकारचा गणेश मंडळांना दिलासा, परवानगी मिळवण्यासाठी ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया

‘सोनिया गांधी, राहुल गांधी असोत किंवा संजय राऊत…’; ईडी चौकशीवरून राऊतांचं मोठं वक्तव्य

“… त्या बरोबर म्हणाल्या, आदित्य ठाकरे हा महाराष्ट्राचा पप्पूू आहे”

काय सांगता! दात घासतानाही लठ्ठपणा कमी करता येणार?, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More