बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांसाठी खूशखबर- मोदी सरकारनं घेतला हा मोठा फायद्याचा निर्णय

नवी दिल्ली | अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कृषी कायद्यांबाबत (Farmers Law) आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. त्यानंतर आज याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी कायदे रद्द करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात येणार होता. विशेष म्हणजे केंद्रींय मंत्रिमंडळातही या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हे विधायक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. नरेंद्र मोदींच्या ( Pm Narendr Modi ) अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाच्या शिफारसीनंतर कृषी कायदे रद्द करण्याबाबत विधेयक तयार करण्यात आलं होतं.

मोदींनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर देशातील शेतकऱ्यांची माफी मागितली होती. यावेळी ते म्हणाले होते, “शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही 3 कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना ताकद मिळावी. हा यामागचा उद्देश होता. मात्र या कृषी कायद्यांना विरोध होऊन हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात (supreme court) गेला त्यामुळे आम्ही हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत,” असं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतरही दिल्ली बॉर्डरवरील शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. मोदींच्या घोषणेवर विश्वास न ठेवता जोपर्यंत संसदेत कृषी कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत (rakesh tikait) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे दिल्ली बॉर्डरवर अजूनही आंदोलन सुरुच आहे.

थोडक्यात बातम्या- 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More