बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वादग्रस्त कृषी कायदे रद्द होणार?, आज होणार अंतिम निर्णय

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच कृषी कायदे (Agriculture Laws) रद्द करण्याची मोठी घोषणा केली होती.  यासंदर्भात आज केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीनंतर कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या कृषी कायदे रद्द करण्यावर आज निर्णय घेतला जाऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतंच जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून वादात राहिलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली होती. मोदी कॅबिनेट (Cabinet) आज बैठक घेऊन या घोषणेवर शिक्कामोर्तब करणार आहे.

मोदी यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही 3 कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना ताकद मिळावी. हा यामागचा उद्देश्य होता. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करून आम्ही हे कायदे आणले होते. मात्र या कृषी कायद्यांना विरोध झाल्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात (supreme court) गेला आता आम्ही हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेत आहे,” असं त्यांनी सांगितलं होते.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतरही दिल्ली बॉर्डरवरील शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. मोदींच्या घोषणेवर विश्वास न ठेवता जोपर्यंत संसदेत कृषी कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत (rakesh tikait) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे दिल्ली बॉर्डरवर अजूनही आंदोलन सुरुच आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर, प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More