गांधीनगर | गुजरात विधानसभा (Gujarat Election ) निवडणुकीत भाजपची पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे. याचसह भाजप सगळ्यात मोठ्या विजयाकडे जाताना दिसत आहे. (Gujarat Election 2022)
आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपने 150 जागांवर आघाडी घेतली आहे. मागच्या 6 वेळा भाजपने गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर आता लागोपाठ 7व्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे.
भाजपला 150 पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं तर गुजरातमधली ही कोणत्याही पक्षाची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी असेल.
यंदाच्या निवडणुकीत भाजपने माधवसिंग सोळंकी यांचा विक्रम मोडण्यासाठी कंबर कसली होती, त्यामध्ये भाजपला यश मिळताना दिसत आहे.
गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. यापूर्वी 2002 मध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला होता.
2002 च्या निवडणुकीत भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. तर, यावेळी हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे भाजप 2002 मधील स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-