बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जागतिक पातळीवरील नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचं नाव

नवी दिल्ली | प्रेस वॉचडॉग- रिपोर्टर्स विदाउट बाउंड्रीज म्हणजेच आरएसएफने नुकतंच जगातील अशा नेत्यांची यादी जाहीर केली आहे, जे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये जगभरातील तब्बल 37 नेत्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील नावाचा समावेश आहे.

37 जागतिक नेत्यांच्या या यादीमध्ये 17 नवीन नेते आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश आहे. तसेच या यादीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या देखील नावाचा समावेश आहे.

रिपोर्टर्स विदाउट बाउंड्रीजने या यादीत पाकिस्तानविषयी बोलताना म्हटलं आहे की, इम्रान खान यांच्या राजवटीत वृत्तपत्रांच्या छपाईत अडथळे आणले जात आहेत. माध्यम संस्थांना धमकावले जात आहे. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यापासून या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

दरम्यान, या 37 नेत्यांच्या यादीमध्ये सौदी अरबचे क्राउन प्रिंस बिन सलमान यांचं देखील नाव आहे. क्राउन प्रिंस बिन सलमान यांच्या राजवटीला रिपोर्टर्स विदाउट बाउंड्रीजने अत्याचारी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

”या’ प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा’; निवेदिता सराफ यांची मुख्यमंत्र्यांसह, राज ठाकरेंना विनंती

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक केव्हा होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

‘उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला’; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावर कंगनानं उपस्थित केला प्रश्न, म्हणाली…

“माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप यामुळे सरकारने मला क्लीन चीट द्यावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More