बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशभरात वाऱ्याच्या वेगानं पसतोय ट्रेंड, दिसले मोदी की पड पाया!

नवी दिल्ली | महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिरावल्या होत्या. पण आता हळूहळू इंधन दरवाढ होत असताना पाहायला मिळत आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच इंधन दरवाढीला वेग आल्याचं दिसून येत आहे. यावरून सरकारवर टीका होत आहे.

सामान्य लोकांमध्ये इंधन दरवाढीमुळे असंतोष पाहायला मिळत आहे. कारण आधीच लॉकडाऊन असताना रोजगाराचं अवघड झालं आहे. याच पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी एखादी मोहीम हाती घेतात तशाप्रकारे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे पेट्रोल पंपावर गेल्यावर तिथे मोदींच्या फ्लेक्सवरील फोटोला नमस्कार करत आहेत.

#ThankYouModijiChallenge असं मोहीमेचं नाव आहे. पेट्रोल पंपावर गेल्यावर मोदींनी हात जोडून पाठीमागील बाजूने फोटे घेत ते फोटो झपाझप पोस्ट करू लागले आहेत. यामध्ये  लोकं वेगवेगळ्या पद्धती वापरताना दिसत आहेत.

दरम्यान, या फोटोंमध्ये महत्त्वाचं म्हणजे महिलांनीही सहभाग घेतला आहे. महिलाही बेधडकपणे पंपावर फोटो काढत आहे. शहारांमध्येच नाही तर ग्रामीण भागातील तरूणांचाही या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

थोडक्यात बातम्या- 

“हिच्यासोबत जाणार नाय खूप मारते हो”, तरुणाच्या तक्रारीनंतर तरुणीचा पोलीस स्टेशनमधेच राडा

“माफ करा तांत्रिक कारणामुळे आज इंधन दरवाढ झाली नाही; असुविधेसाठी दिलगीर आहोत”

‘सामना’वरुन घमासान; नाना पटोले आक्रमक… म्हणाले, सूर्यावर थुंकू नका!

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; तब्बल इतक्या दिवसांपर्यंत पोलिस कोठडी

…अन् मला नग्न होण्यास सांगितलं, प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे कुंद्राच्या अडचणी वाढल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More