नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी घातलेल्या जॅकेटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. या जॅकेटनं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे मोदीचं हे जॅकेट अगदी वेगळ्या पद्धतीनं तयार केलं आहे.
मोदी नेहमीच त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेत येत असतात. मोदींनी घातलेलं हे जॅकेट साध्या कापडाचं बनलं नसून ते प्लास्टिकच्या (Plastic) बाटल्यांपासून बनवलं गेलं आहे. 6 फेब्रुवारीला बेंगळूरुमध्ये (Bangalore) भारत उर्जा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी इंडियन ऑईल कार्पोरेशननं (Indian Oil Corporation) मोदींना हे जॅकेट गिफ्ट केलं आहे.
पंतप्रधानांनी प्लॅस्टिक बंद करण्याचा संकल्प केला आहे. मोदींच्या याच संकल्पनेनुसार पेट्रोल पंप आणि एलपीजी (LPG) एजन्सींवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असा गणवेश बनवला जाणार आहे. या संकल्पनेला ‘अनबाॅटल इनिशिएटिव्ह’ (Unbattle Initiative) असं नाव देण्यात आलं आहे. यासाठी 100 दशलक्ष पीईटी बाटल्यांचे पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे.
यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे. यामुळे पाण्याचाही मोठ्या प्रमाणात बचत होईल. या जॅकेटसाठी 28 बाटल्यांचा पुर्नवापर (Recycling) केला जातो. दरम्यान असं वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल मोदींनी करणं काही नवीन नाही. यापूर्वी मोदींच्या शालीची प्रचंड चर्चा झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर रेखा बोलली; सिंदूर लावण्यामागचं सांगितलं कारण
- नोटांसारखं आता चिल्लरही काढता येणार; रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची घोषणा
- अदानींचं नाव घेत राहुल गांधींनी सगळंच काढलं; लोकसभेतील भाषण होतंय व्हायरल
- चिंचवडच्या उमेदवारांच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल
- Turkey Earthquake | तुर्कीतील भूकंपाचे भयावह फोटो तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी!