बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींची नक्कल, भाजपचा राडा अन् भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ पहायला मिळाला आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच राडा पहायला मिळला. शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नक्कल केल्यानं वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं.

भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. भास्कर जाधव यांना निलंबित करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. माफी मागा नाहीतर हक्कभंग प्रस्ताव आणू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. भास्कर जाधवांना लाज वाटली पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले होते.

गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं. भास्कर जाधव यांनी सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालावं म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो आणि बिनशर्त माफी मागतो, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी केेलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी केलेल्या वक्तव्यावर मी बोललो, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. भास्कर जाधव यांच्या माफीनंतर आता सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं आहे. भास्कर जाधव यांच्यानंतर उर्जा मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिप्पणी केली होती.

थोडक्यात बातम्या-

“रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यायला काही हरकत नाही”

“उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नातं भाजप नेत्यांना कळणार नाही”

हिवाळी अधिवेशन: …म्हणून पहिल्याच दिवशी हिवाळी अधिवेशन स्थगित

पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत राडा, भास्कर जाधवांवर फडणवीस संतापले

हिवाळी अधिवेशन: ‘तुम्हाला एकतरी परिक्षा घोटाळ्याशिवाय घेता येते का?’; फडणवीस कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More