बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“… मी जिवंत पोहचू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा होणार होती. मात्र, नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना सभा रद्द करावी लागली आहे. आंदोलकांनी मोदींचा ताफा अडवल्याने नरेंद्र मोदी 15 ते 20 मिनिटं उड्डाणपूलावरचं अडकले होते. त्यामुळे भाजप नेते संतप्त झाल्याचं पाहयला मिळालं होतं. आता मोदींनीही यावर प्रतिक्रीया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभा रद्द करत भंटीडा विमानतळावर परतावं लागलं होतं. यावेळी मोदींनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी भटींडा विमानतळावर जिवतं पोहचू शकलो, असं सांगितलं आहे. एकंदरीतच नरेद्र मोदींच्या दौऱ्याची कल्पना असतानाही इतकी मोठी चूक झाल्याने भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होती. सकाळी पंतप्रधान भटीडां येथे पोहोचले. ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय स्मारकाकडे जाणार होते. हवामान खराब असल्याने त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी गाडीने जायचे ठरवले. मात्र, जाताना पंतप्रधानांचा ताफा काही आंदोलकांंनी फ्लायओव्हरजवळ अडवला.

दरम्यान, आंदोलकांनी ताफा अडवल्याने मोदींना फ्लायओव्हरवरचं 15 ते 20 मिनीटं फ्लायओव्हरवरचं अडकून थांबावं लागलं. त्यामुळे पंतप्रधानांनी सभा रद्द करत विमानतळावर माघारी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुरक्षेतीत त्रुटीबाबत गृह मंत्रालायने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मी कधीच बेसावध नसतो’; भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक

बुस्टर डोसविषयी महत्त्वाची घोषणा, राजेश टोपे म्हणाले…

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ब्रिजला गाडीची धडक झाल्यानं चौघांचा मृत्यू

‘ज्याला दाखवायचं आहे त्याला मी…,’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

अनाथांची माय! सिंधुताई सपकाळ अखेर अनंतात विलीन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More