Narendra Modi - सक्तीने नव्हे, ट्रिपल तलाकवर मुस्लीम स्वतः मार्ग काढतील- मोदी
- देश

सक्तीने नव्हे, ट्रिपल तलाकवर मुस्लीम स्वतः मार्ग काढतील- मोदी

नवी दिल्ली | ट्रिपल तलाकवर मुस्लीम समाज स्वतः मार्ग काढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 12 व्या शतकातील समाजसुधारक बसवप्पा यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुस्लीम समाजाने या विषयात राजकारण न आणता विचारमंथन करुन मार्ग काढावा, असं मोदी यावेळी म्हणाले. तसेच ट्रिपल तलाक सक्तीने बंद करण्यास सरकार अनुकूल नसल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात येत्या मे महिन्यात सुनावणी होणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “सक्तीने नव्हे, ट्रिपल तलाकवर मुस्लीम स्वतः मार्ग काढतील- मोदी

  1. मोदी जे बोलले ते अगदी बरोबर आहे , मुस्लिम समाजाने या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे

Comments are closed.