Top News खेळ देश

बोली वाढत होती मात्र चेन्नई हटली नाही, त्या खेळाडूला अखेर घेतलंच!

Photo Courtesy- Facebook/IPL

चेन्नई | बहुप्रतिक्षित आयपीएल 2021 चा लिलाव चेन्नईमध्ये पार पडत आहे. 8 संघाचे व्यवस्थापक 298 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर बोली लावत आहे. या लिलावात चेन्नई सुपर किंगने एका खेळाडूवर तब्बल 7 कोटीची बोली लावत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.

3 वेळचा आयपीएल फायनल विजेता संघ चेन्नई सुपर किंगने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ‘मोईन अली’ याच्यावर  7 कोटीची बोली लावली. पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात लिलावा रम्यान रंगलेल्या लढाईत चेन्नईने बाजी मारत मोईन अलीला आपल्या संघात स्थान दिले आहे. रविंद्र जडेजा आणि सॅम करन सोबत मोईन अलीच्या रुपात तिसरा अष्टपैलू खेळाडू चेन्नईला मिळाला आहे.

मोईन अलीने चालू इंग्लंड-भारत कसोटी सामन्यात तुफान फटकेबाजी करत 18 चेंडूत 43 धावा कुटल्या होत्या. त्यामुळे तो व्यवस्थापकांच्या यादीत होता. शेवटी चेन्नई सुपर किंगने बाजी मारली.

थोडक्यात बातम्या-

पैशांचा मिटर तुटला… युवराज सिंगला लागलेल्या बोलीचा रेकॉर्ड ‘या’ खेळाडूनं तोडला!

गजानन मारणेला आणखी मोठा धक्का, पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

बबब… छप्पर फाडके पैसा!!! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूला लागली जबरदस्त बोली

‘ते’ ट्विट करणं राहुल गांधींच्या अंगलट, ‘या’ वक्तव्यामुळं अडचणीत!

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडतंय असं, ‘या’ महिलेला दिली जाणार फाशी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या