बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्विटरवर हरभजनची गुगली! पाकिस्तानच्या महिला पत्रकाराला म्हणाला, ‘गेट लाॅस्ट…’

मुंबई | आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजयरथ पाकिस्तानने रोखल्यानंतर यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमिर यांच्यात हा सामना संपल्यानंतर ट्विट वार रंगलं आहे. आता या वादात पाकिस्ताननी महिला पत्रकार इकरा नसीर यांनी उडी घेतली आहे. त्यावर हरभजनने देखील इकरा नसीरला खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

हरभजन सिंग तुमच्या आठवणींसाठी हे बघा 4 चेंडूंत 4 षटकार, असं ट्विट करून हरभजन सिंगला डिचवण्याचा प्रयत्न इकरा नसीरने केला आहे.  इस अनपढ़ पत्रकार का मुंह सिर्फ हगने के लिए खुलता है क्या? गेट लॉस्ट नकली पत्रकार. असं म्हणत हरभजन सिंग यांनी इकरा नसीरला प्रत्युत्तर दिलं आहे.

मी एक सामना बघण्यात व्यस्त होतो. ज्या सामन्यात लाला म्हणजे शाहिद आफ्रिदीने हरभजन सिंगला कसोटी सामन्यात 4 चेंडूत 4 षटकार ठोकले होते. परंतु काही हरकत नाही क्रिकेट आहे, काहीपण होऊ शकतं, असं ट्विट मोहम्मद अमिरने केलं होतं. लॉर्ड्सच्या सामन्यात नो बॉल कसा दिला होता. कोणी किती दिले, किती घेतले? कसोटी सामन्यात नो बॉल कसं काय होऊ शकत? या सुंदर खेळाला बदनाम केल्याबद्दल तुम्हाला लाज का वाटली नाही, असा सवाल हरभजन सिंगने उपस्थित केला होता. त्यावर आता पाकिस्तानी पत्रकार इकरा नसीर यांनी उडी घेतली होती.

दरम्यान, भारत पाकिस्तान यांच्यामधील सामना संपल्यानंतर मोहम्मद अमीर आणि हरभजन सिंग यांच्यातील ट्विटर वाॅर थांबता थांबेना झालं आहे. रोज नवीन काही तरी हे खेळाडू आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे या गोष्टींशी सध्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहेत.

पाहा ट्विट-

 

 

थोडक्यात बातम्या-

“आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात…”, क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

फोन रेकाॅर्ड तपासा, मंत्र्यांची नावं समोर येतील; किरण गोसावीचा खळबळजनक आरोप, पाहा व्हिडीओ

“आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय”

गोसावीचा खरा व्यवसाय काय?, लखनऊला त्याने काय बनाव केला?, पुणे पोलिसांनी सांगितलं सविस्तर

“आम्ही अफु-गांजा पिकवूनच आमच्या टेरेसवर ठेवतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More