IPL साठी मुंबई नाही तर हैदराबादचा पर्याय खुला; मोहम्मद अजुरुद्दीनचा बीसीसीआयकडे प्रस्ताव
हैदराबाद | आयपीएलचा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून चालू होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहे. त्याचबरोबर हे सामने काही मोजक्याच ठिकाणी खेळवले जाणार आहेत. मुंबईत या आयपीएल हंगामातील 10 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनामुळे मुंबईत सामने खेळवण्यात येतील की नाही?, याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. यातच भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजुरुद्दीनने बीसीसीआयला ऑफर दिली आहे.
कोरोनाच्या साथीमुळे मुंबईतील आयपीएल सामने स्थलांतरित करण्याची वेळ आली तर हैदराबादमध्ये हे सामने होऊ शकतात, असा प्रस्ताव भारताचा माजी खेळाडू आणि हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद अजुरुद्दीन यांनी बीसीसीआयकडे दिला आहे. मुंबईतील 10 आयपीएल सामने इतरत्र हलवावे लागल्यास बीसीसीआयकडे हैदराबाद आणि इंदूरचे पर्याय आहेत.
मुंबईतील आयपीएल सामने वाढत्या रुग्णसंख्येमुळे अन्य ठिकाणी हलवण्यात येणार नाही, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं आहे. मुंबईत आयपीएल खेळावण्याची पूर्ण तयारी झाली आहे. तरीही लखनौ, इंदोर आणि हैदराबाद हे तीन पर्याय खुले आहेत, अस देखील शुक्ला मोहम्मद अजुरुद्दीनच्या प्रस्तावावर म्हणाले.
दरम्यान, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी चालू असल्याची माहिती शुक्ला यांनी दिली होती. यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत, त्यामुळे कोरोना प्रसार होणार नाही, असं बीसीसीआयने आधीही स्पष्ट केलं होतं.
थोडक्यात बातम्या-
कोब्रा कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात; सहिसलामत सोडण्यासाठी घातली ‘ही’ अट
कोरोनावर मात करण्यासाठी शरद पवारांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन
आता नक्षलवाद्यांचं काही खरं नाही; अमित शहा म्हणाले…
योगी आदित्यनाथांनी शिवी दिल्याचा आरोप; ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका शब्दानेही बोलत का नाहीत?”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.