बंदुकीऐवजी बॅट आणि दगडाऐवजी बॉल हातात घ्या!

Photo- cricknext

नवी दिल्ली | बंदुकीऐवजी बॅट आणि दगडाऐवजी बॉल हातात घ्या, असं भावनिक ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं काश्मिरी तरुणांना केलं आहे. त्याने एक व्हिडिओही सोबत ट्विट केलाय. 

काश्मीरच्या एका गावातील मंझुर दर या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. त्यानंतर या गावातील नागरिकांनी जो जल्लोष केला त्याचा हा व्हिडिओ आहे. 

दरम्यान, मोहम्मद कैफच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलंय. त्याचं ट्विट मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जातंय.