बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिहारचा बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनचं कोरोनाने निधन

नवी दिल्ली |  बिहारचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा नेते आणि माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याचं कोरोनाने निधन झालं आहे. मोहम्मद शहाबुद्दीन दुहेरी हत्याकांडात शिक्षा भोगत होता. मोहम्मद शहाबुद्दीनच्या मृत्युची माहिती तिहार तुरूंगाचे कारागृह महानिरीक्षक संदीप गोयल यांनी दिली आहे.

मोहम्मद शहाबुद्दीनची बुधवारी अचानक प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्याला दिल्लीतील दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्याला कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यानंतर शहाबुद्दीनची प्रकृती स्थिर असल्याचं तिहार तुरुंग प्रशासनाने सांगितलं होतं.

शनिवारी मोहम्मद शहाबुद्दीनचं निधन झाल्याचं काही माध्यमांनी सांगितलं होतं तर काही माध्यमांनी ही अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता तिहार तुरूंगाच्या कारागृहाचे महानिरीक्षक संदीप गोयल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  कोरानाच्या उपचारादरम्यान शहाबुद्दीनचं दिल्लीतील रुग्णालयात निधन झालं असल्याचं गोयल म्हणाले.

दरम्यान, वसूलीचा पैसा न दिल्याने दोन भावांची हत्या करण्यात आल्याची ही घटना होती. त्यावेळी 2004 मध्ये दुहेरी हत्याकांडात शहाबुद्दीनला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. मोहम्मद शहाबुद्दीनचा बिहारमध्ये दबदबा होता. तो दोन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार राहिला होता.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! तरुणीचा पाठलाग करुन भररसत्यात फाडले तिचे कपडे अन्…

प्रेयसीवर संशय घेऊन मध्यरात्री तिच्या घरी जाणं प्रियकराच्या जीवावर बेतलं; घडला धक्कादायक प्रकार

कोरोना झालेल्या माजी सैनिकाचा ऑक्सिजन अभावी झाला तडफडून मृत्यू

राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं कोरोनाने निधन

‘मुंबईकरांनो घरातून बाहेर पडू नका’; किशोरी पेडणेकरांनी जोडले हात

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More