चेन्नई | इग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 222 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे एकीकडे भारतीय संघावर टीका होत आहे तर एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने फिरकीपटू कुलदीप यादवचा गळा धरला आहे. व्हिडीओमध्ये सिराज ड्रेसिंग रूममध्ये जाणाऱ्या खेळाडूंचं मनोबल वाढवताना दिसत आहे. मात्र कुलदीप आला की त्याचे हावभाव बदलतात आणि तो कुलदीपची कॉलर पकडतो आणि आपल्या जवळ खेचताना दिसत आहे.
कुलदीप आणि सिराजमध्ये नक्की काय झांलं हे समोर आलं नाही. परंतू व्हिडीओमध्ये जे दिसत आहे त्यावरून काहीतरी बिनसल्याची शक्यता आहे. बीसीसीआयनेही यावर कोणतंही स्पष्टीकरण न दिल्याने भारतीय चाहते निराश झाले आहेत.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्रीसुद्धा दिसत आहेत. मात्र ते पुढे निघून जाताता तेवढ्यात सिराज कुलदीपचा गळा धरताना दिसत आहे.
What was that ???😢
Is this real or friendly ??#INDvsENG #Kuldeep #siraj #ChennaiTest pic.twitter.com/Z8pI4H6kV3— Gaurang Gundaniya (@itsdocGG) February 6, 2021
थोडक्यात बातम्या-
शिवजयंतीनिमित्त सयाजी शिंदेंचा नवा संकल्प, तुम्हालाही वाटेल अभिमान!
डोक्यात गोळी मारत गोल्डमॅनला संपवलं, दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबार!
“भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय”
टाटा देतंय भन्नाट ऑफर!! आता 80 हजारात आणा ही कार..
“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता, मनसेवाले टप्प्यात आणून करतात”