सानिया मिर्झा मोहम्मद शमीला करतेय डेट?, दोघांचे स्विमिंगपूलमधले फोटो तूफान व्हायरल

Mohammed Shami and Sania Mirza photo viral

Mohammed Shami and Sania Mirza | भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि माजी टेनिसपटू सानिया मिर्झा दोघेही खेळाडू सध्या सिंगल आयुष्य जगत आहेत. गेल्यावर्षी सानिया मिर्झा (Sania Mirza) पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून विभक्त झाली. तर, मोहम्मद शमीचा देखील घटस्फोट झालाय. यानंतर शमी आणि सानिया या दोघांबाबत वेगळ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. (Mohammed Shami and Sania Mirza )

नुकतेच दोघांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. हे फोटो बघून नेटकरी हैराण झाले आहेत. आता हे फोटो खरे आहेत की खोटे याबाबतही बोललं जातंय. दोघांचे फोटो बघून ते एकमेकांना डेट तर करत नाहीयेत ना?, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सानिया व शमीचे ‘ते’ फोटो व्हायरल

व्हायरल फोटोमध्ये सानिया आणि मोहम्मद शमी दोघेही स्विमिंगपूलमध्ये दिसून येत आहेत.ते एकमेकांच्या खूपच जवळ दिसून येत आहेत. तर, दुसऱ्या एका फोटोत सानिया मिर्झा आणि शमी काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांमध्ये सेल्फी घेताना दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय. हे फोटो अगदी खरे असल्यासारखे भासत आहेत. (Mohammed Shami and Sania Mirza )

मात्र, खरं पाहायला गेलं तर र हे सगळे फोटो फेक असुन ते AI द्वारे बनवण्यात आले आहेत. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेले हे सर्व फोटो एका फेसबूक युजरने शेअर केले आहेत. हे सर्व फोटो फेक आहेत. मात्र, या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दोघांचाही झालाय घटस्फोट

या प्रकरणी अद्याप सानिया किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या बातम्या या खोट्या ठरल्या आहेत. या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. फोटो खरे की खोटे, हे समजणं खरंच खूप कठीण झाल्याचं, एकाने लिहीलंय. तर हे फोटो नक्कीच फेक आहेत, असं दूसरा एक नेटकरी म्हणाला.

दरम्यान, सानिया मिर्झाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्याशी लग्न केलं होतं, मात्र अनेक वर्षांच्या लग्नानंतर ते विभक्त झाले. गेल्या वर्षी ते विभक्त झाले. सानियापासून वेगळं होताच शोएबने तिसरं लग्नही केलं.तर मोहम्मद शमीनेही 2018मध्ये त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. (Mohammed Shami and Sania Mirza )

News Title : Mohammed Shami and Sania Mirza photo viral

महत्त्वाच्या बातम्या-

कोणत्या कारच्या कंपनीला भारतात सर्वाधिक मागणी?, महत्त्वाची आकडेवारी उघड

देशमुख प्रकरण भोवलं! धनंजय मुंडेंचा पत्ता कट?

नोंदणी विवाहासाठीची प्रक्रिया काय असते?, अर्ज ते कागदपत्रे सर्व माहिती जाणून घ्या

वाल्मिक कराडने केली सर्वात मोठी मागणी!

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, घरात ही गोष्ट असेल तर मिळणार नाही लाभ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .