Mohammed Shami | भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीच्या कारणास्तव त्याने आयपीएलच्या आगामी हंगामातून माघार घेतली आहे. वन डे विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यापासून शमी क्रिकेटपासून दूर आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या टाचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटो शेअर करून त्याने त्याच्या उपचाराबाबत चाहत्यांना माहिती दिली.
आपल्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना शमीने सांगितले की, तो हळूहळू बरा होत आहे. त्याला पूर्णपणे सावरायला थोडा वेळ लागेल, पण क्रिकेटच्या मैदानात परतण्याचा विश्वास आहे. “आत्ताच टाचांचे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले आहे. बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर परत उभा राहून मैदानात येण्यासाठी खूप उत्सुक आहे”, असे शमीने नमूद केले.
शमीचे रूग्णालयातील फोटो
19 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वन डे विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीदरम्यान शमीला दुखापत झाली होती. दुखापतग्रस्त असताना देखील त्याने विश्वचषक खेळला होता. त्याने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि सात सामन्यांमध्ये 24 बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.
आयपीएल 2024 सुरू व्हायला अजून एक महिना बाकी आहे. त्याआधी 2022 चा चॅम्पियन संघ आणि 2023 च्या उपविजेत्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत सांगितले की, डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे शमी संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे.
Just had a successful heel operation on my achilles tendon! 👟 Recovery is going to take some time, but looking forward to getting back on my feet. #AchillesRecovery #HeelSurgery #RoadToRecovery pic.twitter.com/LYpzCNyKjS
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) February 26, 2024
Mohammed Shami ची दुखापत
दुखापतीमुळे शमीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही निवड झाली नाही. याशिवाय तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर आहे. शमीची अनुपस्थिती गुजरातसाठी मोठा झटका मानला जात आहे. हार्दिक पांड्या गुजरात सोडून मुंबई इंडियन्समध्ये गेल्याने संघाचे आधीच नुकसान होत आहे.
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली आहे. त्यामुळे शुभमन गिलकडे गुजरातच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला पायउतार व्हावे लागले असून हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
News Title- Mohammed Shami underwent a successful surgery and shared pictures from the hospital
महत्त्वाच्या बातम्या –
अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये 100 टक्के पाणीकपात
‘मराठी भाषा गौरव दिन’! राज ठाकरेंची लांबलचक पोस्ट; तरूणांना केलं खास आवाहन
व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोचा गुपचूप स्क्रिनशॉट घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार!
बाबरचा झंझावात! ठरला जगातील दुसरा खेळाडू; फ्रँचायझीकडून महागडी गाडी भेट
“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य