शमीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप

कोलकाता | भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्याची पत्नी हसीन जहाँने केला आहे.

शमीच्या मोबाईलमधील काही स्क्रीनशॉट तीने फेसबुकवर पोस्ट केले आहेत. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तीने केला आहे.  

दरम्यान, 27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. दोघांना आयरा नावाची मुलगीही आहे.