पत्रकारांच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी, ‘या’ पत्रकाराला अटक!
मुंंबई | महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून राज्यासह देशातही खळबळ उडाली आहे. राजकीय वातावरण तापलं असताना एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आल्ट न्यूज या फॅक्ट चेक वेबसाईटचे सहसंस्थापक मोहम्मद झुबीर यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी झुबीर यांच्यावर कलम 143 आणि कलम 295 अ अंतर्गत कारवाई केली आहे. मोहम्मद झुबीर यांनी केलेल्या काही ट्विट्सवर आक्षेप घेण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटनं झुबीर यांना अटक केली आहे.
मोहम्मद झुबीर यांच्या विरोधात पुरावे असल्याने त्यांना अटक केली असल्याचं दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका खटल्यात नमूद केलं आहे. पोलिसांकडून झुबीर यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं जाईल. तर पोलिसांकडून झुबीर यांची कोठडी देखील मागितली जाऊ शकते.
दरम्यान, द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया झुबीर यांनी दिली आहे. तर झुबीर यांनी काही द्वेषपूर्ण भाषणासंदर्भातील काही स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ‘ही’ आहे भाजपची भूमिका, मुनगंटीवार म्हणतात…
शिंदे-ठाकरेंमध्ये सत्तासंघर्ष सुरु, इकडे दोन कलाकारांमध्ये वातावरण पेटलं!
शिवसेनेला आणखी एक झटका!, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका
“महाराष्ट्रात असता तर कोणत्याही बिळातून फरफटत आणलं असतं”
Comments are closed.