देश

सरकार कोणाचेही असो निवडणुकीनंतर राम मंदिर उभारणार- मोहन भागवत

देहराडून | सरकार कोणाचेही असो लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करेल, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

उत्तराखंडमधील डेहराडून येथे संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राम मंदिर, धार्मिक भेदभाव आणि जातीय आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली.

एक दिवसापूर्वीच विश्व हिंदू परिषदेने लोकसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भागवत यांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

दरम्यान, राम मंदिर उभारणीची तारिख भागवत यांनी सांगितलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

-एस.टी.वाचवा जनजागृती सभेचं आयोजन करून साजरा केला मुलीचा वाढदिवस

…तर देशभर फिरून अधिक तीव्र आंदोलन करणार- अण्णा हजारे

मुंडे साहेबांचा अपघात झाला की घात? हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना पडलेला प्रश्न- धनंजय मुंडे

“…तर त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात टाकू”

“डोनाल्ड ट्रंम्प यांनीही केली नरेंद्र मोदींच्या राज्यकारभाराची प्रशंसा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या