देश

भौतिक सुख वाढलं तरी लोक आंदोलन करत आहेत- मोहन भागवत

Loading...

गांधीनगर | समाजात भौतिक सुख वाढले आहे तरी लोक आंदोलन करत आहेत, असं वक्तव्य संरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. वर्तमानकाळातील जागतिक दृष्टीकोणातून हिंदुस्थानची भूमिका या विषयावर अहमदाबाद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भौतिक सुख वाढलं आहे तरी लोक असमाधानी आहेत. या अस्वस्थतेतून लोक आंदोलन करत आहेत. तसेच राजकीय पक्षांकडे सत्ता नसल्याने तेसुद्धा आंदोलन करत असल्याचं मोहन भागवत म्हणाले आहेत.

हिंदूस्थानने जगाला धर्म द्यावा जेणेकरुन जगात ज्ञान पसरेल. त्यामुळे मनुष्य रोबोट होणार नाही. आम्ही वैश्विक कुटुंबाची चर्चा करतो वैश्विक बाजाराची नाही. मालक, नोकर, शिक्षक, विरोधी पक्ष, सामान्य माणूस सर्वजण आंदोलन करत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन देशात अंशातता आणि अस्वस्थता आहे. याविरोधात लोक आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर भागवतांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

केजरीवालांची फुकट योजना महाराष्ट्रात नको- अजित पवार

“परदेशी कन्येपासून झालेला राहुल गांधींचा जन्म देशासाठी मोठी चूक”

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांकडून नाशिक दौरा अचानक रद्द; उद्या राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची महत्वाची बैठक

कारवाई केली तर इंदुरीकरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू- सुरेश धस

कोरेगाव-भीमा प्रकरणाची माहिती लपवण्याचा केंद्राचा डाव- शरद पवार

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या