Top News विधानसभा निवडणूक 2019

अयोध्या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीने पाहू नये- मोहन भागवत

मोहन भागवत, सरसंघचालक

नागपूर | राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राम मंदिर उभारण्याच्या कार्यात ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्याबद्दल भागवतांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. जय-पराजयाच्या दृष्टीने या निर्णयाकडे पाहू नये. योग्य निर्णय देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आभार, असं ते म्हणाले आहेत.

न्यायालयाच्या निर्णयामुळे जनतेला न्याय मिळाला आहे. भुतकाळ विसरुन आपण पुन्हा एकत्र येऊया. सर्वांनी संयमाने या घटनेचा आनंद व्यक्त करावा. कोणाच्याही भावनांचा अनादर होईल, असे वर्तन करु नये, असं आवाहन भागवतांनी केलं आहे.

देशाच्या जनतेने इतके वर्ष जो संयम बाळगला त्यांबद्दल त्यांचे अभिनंदन. देशाचे वातावरण खराब होईल, असं कोणतंही वर्तन होऊ नये. सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखावा,  असं भागवत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या