बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसी यांचा DNA एकच”

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच हिंदु- मुस्लिमांमध्ये मतभेद नाहीत. स्वत:ला हिंदू नाही तर भारतीय म्हणा, सगळ्यांचा डीएनए एकच आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. शिवसेना,  एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि बहुजन समाज पार्टी प्रमुख मायावती यांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर टीका केली होती. आता काँग्रेसनेही मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. जर हिंदु आणि मुस्लिमांचा डीएनए एक आहे, तर धर्म परिवर्तन आणि लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची काय गरज आहे ?, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे. तर मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसींचा डीएनएदेखील एकच आहे, असंही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

आरएसएसचे भागवत म्हणाले लिंचिंग करणारे हिंदुत्वविरोधी आहेत. मात्र भ्याडपणा, हिंसाचार आणि हत्या ही गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा अविभाज्य भाग आहेत. मुस्लिमांची लिंचिंग देखील याच विचारसरणीचा परिणाम आहे, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी मोहन भागवत यांच्यावर केली होती.

दरम्यान, जर तुम्ही बोललेल्या वक्तव्यावर ठाम असाल, तर ज्यांनी निर्दोष मुस्लिमांना त्रास दिला, त्यांना आपल्या पदावरुन तात्काळ हटवा. त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून करा. भागवतजी हे विचार तुम्ही तुमच्या शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनाही देणार का?, असा प्रश्न देखील दिग्विजय सिंह यांनी याआधी विचारला होता.

थोडक्यात बातम्या-

‘रेमडेसिवीरनंतर आता महाराष्ट्रात ‘बर्नोल’ची मागणी वाढतीये खासकरून…’; नितेश राणेंची जहरी टीका

“भाजपने आमचे आभार मानावेत; मोदींच्या मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना-राष्ट्रवादीचाच”

“जे पद मिळालं त्यापेक्षा राणेंची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”

आजारी असतानाही खडसे चौकशीसाठी हजर, म्हणाले ‘चौकशी मागे राजकीय हेतू आहे’

“एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं, बिचारे डॉ. हर्षवर्धन…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More